घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यातील विमाननगरमध्ये चालत्या गाडीवर कोसळलं गुलमोहराचं झाड

विमाननगर चौकात उभ्या असलेल्या एका चारचाकीवर गुलमोहराचे झाड कोसळून अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.चार चाकीचे मात्र नुकसान झाले.काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

विमाननगरच्या मुख्य रस्त्यावर झाड आडवे पडल्यामुळे येथील वाहतूक आपोआपच बंद झाली. रहदारीची वेळ असल्यामुळे आणि रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे विमाननगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.

विमाननगरमधून सोमनाथ नगर, सोपाननगरकडे जाणाऱ्या मंडळींना शंभर मीटरसाठी अगदी चार किलोमीटरचा वळसा घालावा लागला. अग्निशामक दराने काही मिनिटातच घटनास्थळी येऊन झाड बाजूला केले.

प्रत्यक्षदर्शी गणेश पवार म्हणाले , शुक्रवारी दुपारी मोठ्या प्रमाणात वारा सुटला होता. दोन दिवस पाऊसही झाला. त्यामुळे जुने असलेले गुलमोहराचे मोठे झाड चौकात वळणावर कोसळले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें