घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पारगाव (कारखाना) पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये गहाळ झालेले एक लाख ८० हजार रुपये किमतीचे एकुण १२ मोबाईल मूळ मालकांना परत केले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल , अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी पारगाव कारखाना पोलीस ठाणे हददीतील नागरिकांचे हरवलेले मोबाईलचा शोध घेणे कामी पथक तयार करून हरविलेले मोबाईलचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे पोलीस उप निरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस अंमलदार मंगेश अभंग. संजय साळवे यांनी सी.ई.आय. आर. पोर्टल’व इतर तांत्रिक बाबींचे आधारे पोलीस ठाणे हद्दीतील मोबाईल मिळालेल्या लोकांशी संपर्क साधुन हरवलेल्या मोबाईलची बाबतची माहिती प्राप्त करून चिकाटीने व अथक परिश्रम करून मोबाईल शोध मोहिम राबविल्याने ‘ माहे मार्च २०२६ महिन्यामध्ये पारगाव कारखाना पोलीस ठाणे हददीतील नागरिकांचे गहाळ झालेले एक लाख ८० हजार रुपये किमतीचे एकुण १२ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे.

सदरचे मोबाईल सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांचे हस्ते आज शनिवारी मूळ तक्रारदार यांना परत करण्यात आलेले आहेत. सदरची मोहिम अविरतपणे राबविण्यात येणार असल्याचे सचिन कांडगे यांनी सांगीतलेल आहे.

पारगाव कारखाना पोलीस ठाणेकडून सन २०२५ – २०२६ या कालावधीमध्ये आज पर्यत तक्रारदार यांचे गहाळ झालेले एकुण ३७ मोबाईल तक्रारदार यांना परत करण्यात आलेले आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें