घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

गरीब असल्याचे भासवायला सांगायचे अन् दागिने घेऊन फरार व्हायचे; तिघांना अटक

बोलबच्चन करून वयोवृद्धांचे सोन्याचे दागिने पळविणार्‍या तिघांच्या टोळीला साकिनाका पोलिसांनी अटक केली आहे. संतोष गंगाराम चौरे, बालाजी रोहिदास पवार आणि लक्ष्मण रोहिदास पवार अशी या तिघांची नावे असून ते तिघेही अकोला आणि परभणीचे रहिवाशी आहेत.

हे तिघेही अत्यंत चलाखीने ज्येष्ठ नागरिकांकडे जायचे आणि त्यांच्याशी गप्पागोष्टी करून त्यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने काढून ठेवण्यास प्रवृत्त करत होते. मात्र या तिघांच्या अटकेने तेरा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून सुमारे पंधरा लाखांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

अटकेनंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.साकिनाका येथे राहणाऱ्या 77 वर्षीय तक्रारदार महिला 24 मार्चला मच्छिमार्केट येथे गेल्या होत्या. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी तक्रारदाराशी जुना परिचय असल्याचा आव आणला.

तसेच तक्रारदाराला सांगितले की, त्यांच्या शेठला मुलगा झाला असून ते गरीबांना मोफत साडी देत आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही ही मदत हवी असेल, तर तुम्हाला अत्यंत गरीब किंवा गरजू असल्याचे भासवावे लागेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगावरील सोन्याची साखळी आणि अंगठी काढून पिशवीत ठेवा, अन्यथा तुम्हाला ही मदत मिळणार नाही.

वृद्ध पीडित महिलेने दागिने काढल्यानंतर आरोपींनी सोन्याचे दागिने आणि कॅश असा दोन लाखांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच साकिनाका पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला होता.

सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून डोंबिवली येथून संतोष चौरे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून बालाजी आणि लक्ष्मण पवार या दोन बंधूंना शिर्डी येथून पोलिसांनी अटक केली. चौकशीत ते तिघेही बोलबच्चन करून फसवणूक करणार्‍या टोळीतील सदस्य असल्याचे उघडकीस आले.

चौकशीत संतोष चौरे हा अकोला येथे राहत असून मजुरीचे काम करतो. तो या गुन्ह्यातील तो मुख्य आरोपी असून त्याच्याविरुद्ध 26 गुन्हे दाखल आहेत. तसेच बालाजी आणि लक्ष्मण हे दोन्ही बंधू परभणीच्या गंगाखेडचे रहिवाशी असून सध्या कल्याण येथे राहतात. ते दोघेही बेरोजगार असून संतोष चौरे याच्योबत अशाच प्रकारचे गुन्हे करतात. यातील बालाजीविरुद्ध प्रत्येकी तीन गुन्ह्यांची नोंद आहे.

ही टोळी रस्त्यावर जाणार्‍या पादचार्‍यांना विशेषत: वयोवृद्धांना टार्गेट करून त्यांच्या शेठला मुलगा झाला आहे, साडी व रेशन वाटप सुरू आहे, असे बोलबच्चन देऊन त्यांची फसवणूक करतात.

तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मुंबई आणि नवी मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या अटकेने मुंबईसह नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यातील तेरा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील 15 लाख 46 हजार 250 रुपयांचे 123 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें