घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

गर्भलिंगनिदान प्रकरणात रुपाली चाकणककरांचे नाव, खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

अशोक खरातप्रकरणी अद्यापही एसआयटीकडून आरोपीचा कसून तपास केला जात आहे. या तपासातून दररोज नवनवे कारनामे समोर येत आहे. याचदरम्यान नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात गर्भलिंगनिदानाचा नवा ट्विस्ट समोर येत बीड कनेक्शन समोर आले आहे.

या नव्या ट्विस्टमध्ये रुपाली चाकणकरांचे नाव पुन्हा समोर आले आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना बीडमधून निनावी पत्र आले आहे. या पत्रातून बीड कनेक्शन समोर आले आहे.

रुपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने बीडमधील महिला पदाधिकारी अशोक खरातकडे येथील महिला नेत होत्या, असा खळबळजनक दावा या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गर्भलिंग निदान याबाबत चाकणकरांकडून अशोक खरात पाठराखण केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या हेमा पिंपळे यांनी केला आहे.

पिंपळे यांनी संबंधित पत्राचा दाखलाही दिला आहे.या पत्रानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी पत्राची सत्यता तपासून पोलीस अधीक्षकांनी सुमोटो दाखल करत एसआयटीकडे हे पत्र द्यावे, याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा लिंगनिदान होण्यासाठी पाठबळ देत होत्या.ही गंभीर बाब असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

संबंधित पत्रावरील सहीची तपासणी केली तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता, येईल म्हणून त्याची सत्यता तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान अशोक खरातकडे बीडमधील महिला जात होत्या अशी चर्चा आतापर्यंत बीडमध्ये होती. परंतु या पत्रातून त्याला उजाळा मिळाला असल्याचं पिंपळे यांचं म्हणणं आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें