घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

‘उपाय’ आणि अघोरी पूजेच्या नावाखाली गुन्हा घडल्याचे समोर

महाराष्ट्रातील नाशिकमधील भोंदू कॅप्टन खरात प्रकरण ताजे असताना आता रायगडमध्ये एका भोंदू बाबाने एका महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.नवऱ्याच्या बाहेरील प्रेमप्रकरणाला कंटाळून उपाय मागण्यासाठी ही महिला या बाबाकडे गेली असता अनुचित प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी पिडीत महिलेने खालापुर पोलिस ठाण्यात या भोंदू बाबा विरोधात तक्रार दाखल केली आहे. देव देवतांच्या नावाखाली चालणाऱ्या या प्रकरणामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदू बाबाचे नाव आहे. भोंदू बाबाजान हा नवीमुंबई येथील कळंबोलीमध्य रहिवाशी आहे.

तर पीडित महिला सांताक्रूझ मुंबई येथील रहिवाशी आहे. तसेच सदर प्रकरण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथील निर्जन ठिकाणी असलेल्या एका फार्म हाऊसवर घडली आहे.पिडीत महिला पतीच्या प्रेयसी बाबत उपाय करण्यासाठी भोंदूबाबाकडे गेली होती.

या वेळी उपाय करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाजानने मध्यरात्रीच्या वेळी अघोरी पुजाविधी करण्यासाठी महिलेला खालापूर तालुक्यातील महड येथील निर्जन ठिकाणी असलेल्या एका फार्म हाऊसवर बोलावलं.मध्यरात्रीच्या वेळी ही अघोरी पूजा करताना आरोपीने महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढून तो दोऱ्याला लावून तो दोरा जाळला.

यावेळी सदर भोंदू बाबाने महिलेच्या शरिराला स्पर्ष केला तसेच शारिरीक संबंध करीत लैंगिक अत्याचार केला असल्याचे महिलेने म्हटले आहे. याप्रकरणी खालापुर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. महिलेच्या तक्रारीवरून या भोंदू बबजानला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असून या अशा अघोरी प्रकरणांना बळी न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें