घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा

दिव्यांग कल्याण विभागाचे माजी सचिव तथा आय. ए. एस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. स्वत: तुकाराम मुंढेंनी आईच्या आठवणी जागवत याबाबत माहिती दिली होती.

बीड जिल्ह्यातील त्यांच्या ताडसोना या मूळगावी आसराबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईचे निधन झाले तेव्हा तुकाराम मुंडे प. बंगालमध्ये सेवेत होते, तेथून ते पुण्याला आले, नंतर आपल्या मूळगावी गेले.आपल्या आईच्या निधनानंतर तुकाराम मुंढे यांच्यातला भावनिक माणूस महाराष्ट्राने पाहिला, बंधूंच्या गळ्यात पडून ते रडताना सर्वजण भावुक झाले होते.

मातोश्रींच्या पार्थिवावर अत्यंसस्कार झाल्यानंतरही तुकाराम मुंढे यांच्यातला सामाजिक जावीण जपणारा माणूस दिसून आला.पारदर्शक कारभार, शिस्तप्रिय प्रशासन काटेकोर नियमांचे पालन करून निर्णय आणि अनियमितता खपवून न घेणारे अशी तुकाराम मुंडे यांची महाराष्ट्राला ओळख आहे.

आईच्या मृत्यूनंतर तुकाराम मुंढे यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही त्यांनी एक आदर्श उदाहरण दाखवून दिले आहे. अंत्यविधी झाल्यावर कसल्याही अनावश्यक प्रथा परंपरा रूढींना बाजूला ठेवत त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्यांच्या आईच्या अस्थींचे विसर्जन केले.

imविशेष म्हणजे 10 दिवसांची वाट न पाहता आणि कुठल्याही नदीतरी न जाता वेगळ्या पद्धतीने त्यांनी आईंच्या अस्थींचे विसर्जन केले.आपल्या शेतातील घरासमोर एक खड्डा खांदून त्यात आईच्या अस्थिविसर्जत करत त्यावर एक वडाचे रोपटे लावण्यात आले आहे.

यावेळी, स्वत: त्यांनी ते रोपटे घेऊन, खड्डा खांदून, माती ओतून ते रोपटे लावले.तुकाराम मुंढेंनी अस्थि विसर्जनापासून पुढे होणाऱ्या कर्मकांडांच्या विधींना फाटा दिल्याचे दिसून आले, या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून त्यांच्या या कृतीचं कौतुक होत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें