घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

झेप सामाजिक संस्था आणि वेलवेट पब्लिकेशन करणार जागतिक विक्रम

पुणे / पिंपरी – चिंचवड : नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी निर्माण झालेले वेलवेट पब्लिकेशन दहा महिन्यात नवोदितांचे हक्काचे प्रकाशन बनले आहे. वेलवेट पब्लिकेशनच्या वतीने एकाच वेळी ५० पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम होणार असल्याची माहिती प्रकाशनाच्या संस्थापक वर्षा विशाल ठुकरूल आणि सिंधू बागवे यांनी दिली.

 सांगवी येथील नटसम्राट निळु फुले नाट्यगृहात १२ एप्रिल २०२६ रोजी ,सकाळी १०:३० ते २:३० वाजता आयोजित  कार्यक्रमात हा जागतिक विक्रम होणार असून त्यांची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणार आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव असलेल्या मंजुश्री ओक आणि पत्रकार समीक्षक सौमित्र पोटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 पुढे बोलताना वर्षा विशाल ठुकरूल म्हणाल्या, आमची प्रकाशन संस्था ही व्यावसायिक नाही, ज्या लोकांना आपली पुस्तके छापता येत नाहीत अशा लोकांना आम्ही त्यांची पुस्तके छापून देतो, आम्ही ना नफा ना तोटा  या तत्वावर नवोदित  लेखकांना त्यांची पुस्तके छापून देत आहोत. अगदी २५ प्रतीसुद्धा आम्ही देत आहोत.

मागील दहा महिन्यात आम्ही ६५ पुस्तके छापून दिली आहेत. १२ एप्रिलला होणाऱ्या कार्यक्रमात बहुतांश लेखकांचे पहिले पुस्तक प्रकाशित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.हा जागतिक विक्रम फक्त प्रकाशनाचा नाही तर लिहिणाऱ्या प्रत्येक हातांचा आहे, असं पब्लिकेशनच्या सदस्या लेखिका कवयित्री स्मिता मिलिंद, लेखिका कवयित्री स्वाती कुंभार आणि लेखिका कवयित्री डॉ सुनिता चौधरी म्हणाल्या.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें