घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावे — अरुण पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देणे हीच अजित पवार यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल, अशी अपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र (महाराष्ट्र शासन) तसेच मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीही केली आहे.
अरुण पवार म्हणाले की, अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत आणि विकासात मोलाचे योगदान राहिले आहे. औद्योगिक वाढ, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक विकासकामांमध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते.
ते पुढे म्हणाले की, सध्या राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असून अजित पवार हे महायुतीतील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. विकासासाठी काम करणाऱ्या नेत्याचा सन्मान हा सर्वपक्षीय असायला हवा. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला महापौरपद देणे हा सकारात्मक आणि समन्वयाचा संदेश देणारा निर्णय ठरेल.
असा निर्णय घेतल्यास महायुती सरकारची राजकीय परिपक्वता, सलोखा आणि विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका अधोरेखित होईल. तसेच राज्यातील नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश जाईल, असे मत अरुण पवार यांनी व्यक्त केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें