घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अशोक खरातचा सीडीआर कोणाकडून मिळाला? विरोधकांच्या आरोपांनंतर अंजली दमानियांचा खुलासा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचा पर्दाफाश झाल्यानंतर या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, राज्यभरात अशोक खरातचं प्रकरण चर्चेचा विषय बनलेला असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्याचा CDR सार्वजनिक केला.

मात्र, अंजली दमानिया यांना CDR कसा मिळाला? असे सवाल उपस्थित केले जाऊ लागले. CDR वरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर आता अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी दमानिया यांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले.

अंजली दमानिया म्हणाल्या, गेले 4-5 दिवस वेगवेगळ्या लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत… काही लोकांनी माझ्या विरोधात भाष्य केलं आहे. दुर्दैवाने 31 तारखेपासून काल रात्री पर्यंत मी मुंबईत नव्हते… त्यांच्या इतक्या पत्रकार परिषद मी घेऊ शकले नाही. चंदीगडला असल्यामुळे मी प्रतिक्रिया देऊ शकली नाही. संजय राऊत बोलतात की रॉ ची एजेंट आहे का? अंधारे बोलतात की मी भाजपची माणूस आहे का? क्लोड नावाचं ऍप आहे…31 मार्चला मी सकाळी निघाले दुपारी 12 च्या दरम्यान मला एक मेसेज आला आणि अशोक खरातची माहिती द्यायची आहे करून कॉल मी त्यांचा घेतला.

ते मला बोलले की मी नेहमी तुमचे बातम्या बघतो…मी कोण आहे विचारलं ते बोलले की प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे… दुसऱ्या नंबर वरून मला एक एक्सेल शीट आलं. रात्री मला वेळ मिळाला तेव्हा मी ते सगळं चेक केलं… त्याने सांगितलेल्या कंपनीचे नाव चेक केलं. त्यावरून कळलं की हा माणूस खोटा नाही.. ते एक्सेल शीट मी क्लोडवर टाकलं… ते एक AI सॉफ्टवेअर आहे.

त्यावरून मला माहिती मिळाली..पुढे बोलताना दमानिया म्हणाल्या, जेव्हा मला कळलं की हे खरं आहे.. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मी दाते सरांकडे पाठवलं… मी त्यांना हे ही बोले की जाणूनबुजून मला पाठवलं असेल. ही साधी माहिती आल्यावर त्याची सतत्या कशी ओळखायची ते ही दाखवते.

मी जन्मात अवैध गोष्टी मागत नाही.. अवैध धंदे करत नाही माझ्याकडे आलेली माहिती दाते सरांना आणि फडणवीस यांना पाठवली. जेवढे फोटो होते तेवढे नंबर मी सर्च केले… देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, विखे पाटील , सुषमा अंधारे, संजय राऊत, मोहित कंबोज, गिरीश महाजन यांचे कॉल लागले नाहीत. आम्ही विषयांवर लढतो फालतूचं राजकारण करत नाही, असंही दमानिया म्हणाल्या.

रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे यांचे फोन आहेत… संजय शिरसाठ, मिलिंद नार्वेकर यांचे देखील डिटेल्स आहेत. काल मी एअरपोर्टला बसले होते.. प्रभाकर काळे यांचे काही 6 नंबर आहेत त्यांचे 2 नंबर मी तपासले… त्यात त्याचा समावेश होते. 12 कॉल प्रभाकर काळे यांनी केले.. फक्त 2 कॉल खरात यांनी समोरून केले.

हे सगळे राजकारणी भोंदू बाबांना पाठीशी घालतात. अंधारे बाई बोलतात की अँटी cm लॉबी विरोधात केलं… त्यांना मी सीडीआर पाठवते आणि त्यांनी ही शोधून दाखवावं, असं आव्हानही दमानिया यांनी अंधारे यांना दिलं.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें