घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

बास्केटबॉलचा हुप विद्यार्थ्याच्या डोक्यात कोसळल्याने तरुणाचा करुण अंत

पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बास्केटबॉलच्या ‘हूप’ला पकडून पुश-अप्स करताना हुप कोसळला, या दुर्घटनेत बी.टेकचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला.

मृत विद्यार्थ्याचे नाव विपुल शर्मा असे होते, तो मूळचा उत्तर प्रदेशातील आयोध्या येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच, आई-वडील तातडीने पुण्याकडे रवाना झाले. दरम्यान, हा धक्कादायक प्रकार पुण्यानजीक ताळेगाव इंदुरी परिसरात घडला आहे.

संबंधित घटनेनंतर. ‘तोलानी इन्स्टिट्यूट’मधील विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळल्याचं चित्र आहे. या प्रकरणातील निष्काळजीपणासाठी जबाबदारी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार, असे आश्वासन पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिले. संबंधित प्रकरण हे तळेगाव इंदुरी भागातील आहे.

घडलेल्या घटनेनुसार, विपुल हा बास्केटबॉल कोर्टच्या बाजूने जात असताना, त्याने बास्केटबॉलच्या ‘हूप’वर पुश-अप्स काढले. याच दरम्यान, जड लोखंडी हूप अचानकपणे तुटला आणि थेट त्याच्या डोक्यावर आदळला, ज्यात तरुणाला गंभीर दुखापत झाली. यानंतर अतिरक्तस्त्रावामुळे तो बेशुद्धवस्थेत पडला.

तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी काही काळाचा विलंब झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. नंतर त्याला तळेगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेनं विद्यार्थ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, कॅम्पसमध्ये पुन्हा कोणताही असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला होता. वरिष्ठ अधिकारी संपूर्ण परिस्थितीचा बारकाईने तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें