घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नाशिकच्या बड्या महिला अधिकाऱ्याचे ‘खरात कनेक्शन’ उघड!

नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडू लागले आहेत. पोलीस कोठडीत असलेल्या खरातची कसून चौकशी सुरू असतानाच, या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट प्रशासकीय वर्तुळापर्यंत पोहोचले आहेत.या प्रकरणात एक वरिष्ठ महिला अधिकारी पोलिसांच्या रडारवर आली असून, यामुळे खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती मोठी माहिती लागली असून, एक वरिष्ठ महिला अधिकारी आता थेट तपास यंत्रणेच्या रडारवर आली आहे. नाशिकमध्ये कार्यरत असताना या महिला अधिकाऱ्याने खरातला प्रशासकीय मदत केल्याचा खळबळजनक आरोप होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तत्कालीन महिला अधिकाऱ्याने आणि अशोक खरातने एकमेकांना ‘कथीत’ सहकार्य केल्याचे समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या महिला अधिकाऱ्याने प्रशासकीय पातळीवर खरातचे काम सुलभ केले आणि त्या बदल्यात अशोक खरातने आपले राजकीय व प्रशासकीय नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी पोस्टिंग मिळवून दिल्याची चर्चा सध्या नाशिकच्या वर्तुळात रंगली आहे.

केवळ बदली आणि पोस्टिंगच नाही, तर या महिला अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत का? या दिशेनेही एसआयटीने आपला तपास चक्राकार फिरवला आहे. जर या व्यवहारांचे पुरावे सापडले, तर संबंधित महिला अधिकाऱ्याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें