घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

माणुसकीला काळिमा! दुसऱ्या लग्नासाठी आईकडून 11 महिन्यांच्या मुलाचा काढला काटा

पुणे येथून आईच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका निर्दयी आईने आपल्याच ११ महिन्याच्या पोटच्या मुलाची सिमेंटच्या ओट्यावर आपटून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

एवढेच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी तिने बाळाचा मृतदेह बॅगेत दगड भरून विहिरीत फेकून दिला. ही घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात घडली. रांजणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात याप्रकरणाचा तपास करत पर्दाफाश केला आहे.

रवींद्र अधिक पवार यांनी आपला ११ महिन्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांना सुरुवातीपासून मुलाची आई पूजा हिच्या वागणुकीवर संशय होता. पोलिसांनी पूजाची चौकशी केली, तेव्हा तिने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले.

मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.कशी केली हत्या?आरोपी महिलेने मुलाला सिमेंटच्या ओट्यावर जोराने आपटले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने मुलाचा मृतदेह एका कापडाच्या बॅगेत भरला. बॅग पाण्यावर तरंगू नये म्हणून तिने त्यात जड दगडही भरले आणि ती बॅग गावातील एका विहिरीत फेकून दिली.

मला दुसरे लग्न करायचे आहे आणि जर मुलगा सोबत असेल तर दुसरे लग्न करता येणार नाही, म्हणून तिने बाळाची हत्या केली.आरोपी अटकेतपोलिसांनी विहिरीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढला असून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. रांजणगाव पोलिसांनी आरोपी महिला पूजा पवार हिला अटक केली असून तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें