घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पिंपरी-निगडी मेट्रोला निधीचा ‘बूस्टर’; महापालिकेकडून ५० कोटी मंजूर

पुणे मेट्रोच्या टप्पा एकच्या कामातील स्वारगेट ते पिंपरी मार्गिकेचा निगडीपर्यंत सुमारे साडेचार किलोमीटर विस्तार केला जात आहे. त्यासाठी ९१० कोटी १८ लाख रुपये खर्च अपेक्षित होता.आता निगडीत चौथे स्थानक उभारण्यास सरकारने मंजुरी दिली असून त्यासाठी ५० कोटी रुपये खर्च वाढला आहे. त्यास महापालिका स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र, विस्तारित संपूर्ण मार्गाचा खर्च ९६० कोटी १८ लाखांवर गेला आहे. सद्यःस्थितीत प्रकल्पाचे काम ५५ टक्के झाले आहे.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने २३ ऑगस्ट २०२३ रोजी पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिका विस्तारिकरणास मान्यता दिली आहे. सुरुवातीला तीनच स्थानके होती. नागरिकांच्या सोईसाठी सरकारने नुकतेच १० मार्चला चौथ्या स्थानकाला मान्यता दिली.

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेची स्थानकांसह स्थापत्यविषयक कामे डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रूळ टाकणे आणि विद्युतविषयक कामे सप्टेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करून शेवटच्या तिमाहीत ‘ट्रायल रन’चे नियोजन आहे.- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो, पुणे

दृष्टिक्षेपात महापालिकेचा हिस्सा

२४ ऑक्टोबर २०२४च्या आदेशानुसार ४९ कोटी दिलेमहापालिका हिश्शापोटी ९७.९७ कोटी देणे बाकीमहामेट्रोकडून २६ जून २०२५ रोजी ३५ कोटींची मागणीनिगडी चौथ्या मेट्रो स्थानकासाठी २५ कोटींची मागणीआर्थिक वर्ष अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूदस्थायी समितीकडून ५० कोटी देण्याचा प्रस्ताव ३० मार्चला मंजूर केला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें