पुणे – सोलापूर महामार्गावरील चौफुला नजीक धायगुडेवाडी येथील हॉटेल दुर्गासमोर एका चार चाकी अलिशान गाडीतून साधारणता 29 किलो गांजा एकूण साधारणता 14 लाख 50 हजार रुपये किमतीचा गांजा व बलेनो मारुती सुझुकी कंपनीची गाडी साधारणता किंमत पाच लाख पन्नास हजार असे एकूण वीस लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल यवत पोलिसांनी जप्त केला.अशी माहिती यवत पोलिसांनी दिली.
याबाबत पोलीस हवालदार गुरुनाथ युवराज गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.पुणे – सोलापूर महामार्गावरून गुंगीकारक, अमली पदार्थ गांजाची मालवाहतूक होत असल्याची माहिती गोपनीय खबर्याकडून मिळाल्यानंतर यवत पोलिसांनी नाकाबंदी करत सदर कारवाई केली.
31 मार्च रोजी रात्री साधारणता रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी रंगेहात आरोपींना पकडत कारवाई केली.
शाकीर शब्बीर पानसरे मुळगाव येवलेवाडी (ता. हवेली) सध्या राहणार अहिल्यादेवी चौक चोरमले बिल्डिंग सुपे (ता .बारामती) जि. पुणे , समाधान शिवाजी दाभाडे राहणार येवलेवाडी (ता. हवेली) जि. पुणे या आरोपींना यवत पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख व सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहे.












