घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यातील रस्त्यांवर टँकरची दहशत

भरधाव टँकरने मोपेड दुचाकीवर निघालेल्‍या इंजिनिअर तरुणीला दिलेल्‍या धडकेत तिचा मृत्‍यू झाल्‍याची घटना वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाइटसमोर सकाळी पावणेआठच्‍या सुमारास घडली.

ग्रेसिया डॅनिअल इसा (वय 22, रा. नॅन्सी टॉवर, केदारी पेट्रोल पंपासमोर, वानवडी) असे अपघाती मृत्‍यू झालेल्‍या तरुणीचे नाव आहे.

याप्रकरणी टँकरचालक संतोषकुमार इंद्रदेवप्रसाद मौर्या (वय 45, रा. नेताजीनगर, वानवडी; मूळ रा. रजौली, जि. नवादा, राज्‍य बिहार) असे अटक करण्यात आलेल्‍याचे नाव आहे. याबाबत मुलीची आई गीता डॅनिअल इसा (वय 49, रा. नॅन्सी टॉवर, केदारी पेट्रोल पंपासमोर, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

ग्रेसिया ही इंजिनिअर असून, ती नांदेड सिटी येथे नोकरीला आहे. तिच्‍या कामाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसात आहे. मंगळवारी तिला ऑफिसमध्ये लवकर बोलावले असल्‍यामुळे दुचाकीवरून बाहेर पडली. सकाळी पावणेआठच्‍या सुमारास ती वानवडी येथील गंगा सॅटेलाइटसमोरील रोडवरून जात असताना भरधाव पाण्याच्‍या टँकरेचा दुचाकीला धक्‍का लागला आणि ती खाली पडली.

काही क्षणातच तिच्‍या डोक्‍यावरून टँकरचे चाक गेले. तिला तत्‍काळ ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांपूर्वीच तिचा मृत्‍यू झाल्‍याचे घोषित करण्यात आले. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सारिका शिर्के तपास करीत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें