भीमराव
मानवतेच्या शिरपेचातील तेजस्वी तुरा,
अन्यायाचा कर्दनकाळ, अंधारातील उजेड झरा,
कातळातील निर्मळ झरा –
तोच आमचा भीमराव…
समतेचे रणसिंग फुंकणारा,
दुर्बलांचा खंबीर आधार,
लोकशाहीचा महामेरू उंचावणारा –
तोच आमचा भीमराव…
प्रज्ञा, शील, करुणेची पेरणी करणारा,
माणुसकीच्या भावनांना साद घालणारा,
विज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारा –
तोच आमचा भीमराव…
शिक्षणाचा मूलमंत्र देणारा,
माणसाला माणूसपण बहाल करणारा,
जिद्दीने समतेचा नारा घुमवणारा –
तोच आमचा भीमराव…
संविधानाचा शिल्पकार, कायद्याचा ज्ञाता,
माणसासाठी झटणारा अथक योद्धा,
स्वप्नांना सत्यात उतरवणारा –
तोच आमचा भीमराव…
करुणेचा अथांग सागर,
शांतीचा अखंड पुरस्कर्ता,
पेनातील शाईतून क्रांती घडवणारा –
तोच आमचा भीमराव…
ज्ञानाची गरुड झेप घेणारा,
समतेची उत्तुंग भरारी घेणारा,
प्रज्ञासूर्य तेजाने उजळणारा –
तोच आमचा भीमराव…
🖋️ लेखणी : कवी जगदीश











