घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर

वारजे भागात मद्यधुंद कार चालकाने चार ते पाच वाहनांना धडक दिल्याची घटना मंगळवारी घडली. कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाचे कार चालकाने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वारजे वाहतूक विभागातील पोलिस शिपाई अमोल पिसाळ यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर हे न्यायालयीन कामकाजासाठी मंगळवारी (ता. ७) दुपारी वारजे परिसरातून निघाले होते.

त्यावेळी वारजे – एनडीए रस्त्याने प्रवासी वाहतूक करणारी कार भरधाव वेगात शिवणेकडे निघाली होती. त्या कारने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. या घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन क्षीरसागर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कर्मचाऱ्यांनी कार चालकाचा पाठलाग सुरू केला. वारजे चौकाजवळ मद्यधुंद कार चालकाने एका टेम्पोला धडक दिली. त्यावेळी क्षीरसागर यांनी प्रसंगावधान राखून कार अडवली.

वारजे माळवाडी वाहतूक शाखेतील दोन पोलिस कर्मचारी कार वारजे पोलिस चौकीत घेवून जाण्यासाठी कारमध्ये बसले. तेव्हा कार चालकाने कार पोलिस चौकीकडे न नेता दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. क्षीरसागर यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी पुन्हा कार काही अंतरावर अडवली. पोलिसांनी मोटार चालकाला चोप देऊन ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत मोटार चालकाने मद्यप्राशन केल्याचे दिसून आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें