प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा मदत करणारे हात पवित्र असतात” या भावनेतून उरुळी कांचन येथे नसलेली रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २००७ साली कस्तुरी प्रतिष्ठानची स्थापना झाली अन त्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कस्तुरी ग्रुपला ही सेवा चालू करताना, रुग्णवाहिका घेण्यासाठी आर्थिक व मानसिक बळ देण्यात ज्या माणसाचा मोलाचा वाटा होता ते म्हणजे या ग्रुपचे सचिव शंकर पाटील.
त्यांचे नुकतेच निधन झाले,शंकर पाटील यांची व्यायामाची आवड लक्षात घेऊन काल जागतिक आरोग्य दिनाचा मुहूर्त साधत कस्तुरी प्रतिष्ठान संचलित कस्तुरी ग्रुपने त्यांच्या स्मरणार्थ दि.०७.एप्रिल २०२६ पासुन एक नवीन रुग्णवाहिका कै.शंकर पाटील यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांच्या हस्ते लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली.
प्रतिष्ठानच्या एका चांगल्या कार्यकर्त्याच्या स्मृती कायम जिवंत ठेवण्यासाठी रुग्णसेवेचा मार्ग कस्तुरी ग्रुपने निवडला.यावेळी पाटील कुटुंबीय तसेच कस्तुरी ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.कस्तुरी ग्रुपने पाटील कुटुंबियांना सहकार्याच्या भावनेतुन एक लाख रुपयांचा धनादेश देऊन आपल्या मैत्रीची भावना जागवली.












