हिंदू परंपरेत वडिलांच्या निधनानंतर मुलगा मुखाग्नी देतो आणि अंत्यविधी पार पाडतो. याला ‘कर्ता’ म्हटले जाते, जो वंश पुढे चालवतो आणि पितरांच्या मुक्तीसाठी अंत्यसंस्कार, दहन व 13 दिवसांचे विधी करतो.
कारण मुली लग्नानंतर दुसऱ्या कुळाचा भाग होत असल्याने ही जबाबदारी मुलावर असते. मात्र 21 व्या शतकात समाजात होणाऱ्या बदलांमुळे मुलगी सुद्धा वडिलांच्या निधनाला मुखाग्नी देऊन अंत्यविधी पार पडताना दिसते. परंतु ही गोष्ट क्वचितच होते. असे असले तरी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे एकुलत्या एक लेक आपल्या वडिलांच्या निधनानंतर खचली नाही.
तिने स्वत: वडिलांचा अंत्यविधी पार पाडत 21व्या शतकात स्री-पुरुष समानता केवळ बोलण्यात नाही, तर कृतीतूनही दाखवून दिली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, कर्नलवाडी येथील रहिवासी सुभाष दादासाहेब निगडे यांचं अकस्मात निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एकुलती एक मुलगी उत्कर्षा असा परिवार आहे.
वडिलांच्या निधनाने निगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा दुख:च्या प्रसंगातही उत्कर्षाने वडिलांचा अत्यंविधी स्वत:चा करण्याचा धैर्याने निर्णय घेतला. माझ्या वडिलांनी मला कधीच मुलापेक्षा कमी मानलं नाही. त्यामुळे त्यांच्या शेवटच्या प्रवासात कर्तव्य पार पाडणं हा माझा हक्क आहे, अशी भावना उत्कर्षाने व्यक्त केली.
महत्त्वाचे म्हणजे उत्कर्षाच्या या निर्णयामागे निगडे कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे अशा कठीण प्रसंगातही मुलीला कुटुंबियांनी दिलेला आधार समाजासाठी प्रेरणादायी ठरताना दिसत आहे.उत्कर्षाने बारामती येथील वैकुंठ स्मशानभूमीत आपल्या वडिलांवर धैर्याने सर्व विधी पूर्ण केले.
महत्त्वाचे म्हणजे उत्कर्षाने केलेली कृती ही केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून समाजाला दिशा देणारी आहे. कारण 21व्या शतकात स्री-पुरुष समानतेची फक्त चर्चा होताना दिसते. मात्र उत्कर्षाने स्री-पुरुष समानता कृतीतून दाखवली दिली आहे. त्यामुळे तिच्या माध्यमातून स्री-पुरुष समानतेचा संदेश समाजात गेला आहे.












