*सलाम*
*कवी - जगदीश आ. कांबळे*
सलाम
बाबासाहेब, महान तुमचे कार्य!
समतेच्या वाटेने मानवतेची बीजे पेरली तुम्ही.
आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वातंत्र्याच्या
तुमच्या विचारांना लाभले अमरत्व.
माणसाला माणसासारखे जगता यावे म्हणून
असंख्य वादळे पार करत
मानवतेचा उंच झेंडा रोवलात तुम्ही.
बाबासाहेब, मनःपूर्वक सलाम तुमच्या कार्याला!
शांती, समता, बंधुता या मूल्यांना
तुमच्यामुळेच प्राप्त झाले खरे मोल.
लोकशाहीत संविधानाचा प्राण ओतून
प्रत्येकाला दिलात हक्कांचा बोल.
भेदाभेद पुसून टाकणाऱ्या
तुमच्या लेखणीला मानाचा मुजरा.
समता-समानतेचा अंगीकार करून
झालात तुम्ही माणुसकीचा खरा पहारेकरी.
ज्ञानाची अखंड ज्योत तेवत ठेवून
उजळवला मानवतेचा प्रत्येक कोपरा.
बंधुता आणि प्रकाशाचा मार्ग दाखवत
केलात जगण्याला नवा उजेड सारा.
मानवतेसाठी घेतलेल्या कष्टांना
मनापासून सलाम!
तुमच्या लेखणीने प्रत्येकाच्या जीवनाचे
खरेच केले सोने महान.
ज्ञानाची कवाडे उघडणारे
तुम्हीच ठरलात कोहिनूर,
तमाम मानवजातीला उंचावणाऱ्या
तुमच्या प्रतिभेला त्रिवार नमस्कार भरपूर!
सलाम! सलाम! सलाम! 🙏











