घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे.खरंतर मारेकरी पतीचा आपल्या ८ वर्षांच्या मुलाची हत्या करण्याचा कट होता. मात्र, मुलाला वाचवण्यासाठी आई आडवी आली आणि धारधार शस्त्राचा वार तिच्यावर गेला. या घटनेने खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपी पोलिस ठाण्यात हजर झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव वृषाली निंबोकार असे आहे. तर अनिल निंबोकार असे आरोपीचे नाव आहे. सकाळच्या सुमारास अनिल निंबोकार हा घरात मुलाला मारत असल्याचे दिसताच पत्नी वृषाली ही मध्ये आली. त्यानंतर पतीचा राग अनावर झाला आणि त्याने धारदार शास्त्राने तिच्या पोटात वार करत तिला गंभीर जखमी केलं. घटनेनंतर आरोपीने स्वतः तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

त्यानंतर आरोपी स्वतः पोलिसांसमोर हजर झाला. या घटनेनंतर दोन्ही मुलांचे आई-वडिलांचे छत्र हरवले आहे. या थरारक घटनेने शहर हादरलं असून सध्या पोलीस पुढील कारवाई करत असून अधिक तपास करत आहे.

अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडला त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवणे मोठे आवाहन होते. मात्र पोलिसांनी या घटनेची सखोल तपासणी करत या प्रकरणाचा उलगडा केला.

धक्कादायक बाब म्हणजे मृत रविना पवारला अवघ्या आठ दिवसांचे बाळ असल्याची माहिती समोर आली आहे. आईच्या मृत्यूनंतर या नवजात बाळाच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,या आठ दिवसांच्या बाळाला पुढील संगोपनासाठी चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें