बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. बीडच्या परळीमध्ये ही घटना घडली. या हल्ल्यात नगरसेवक आणि त्याची दोन मुलं गंभीर जखमी झाली आहेत.
नगरसेवकाच्या एका मुलाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस या हल्ला प्रकरणाचा तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळीमध्ये रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.
आझाद नगर या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिज कच्ची यांच्या घरावर काही अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी नगरसेवक आणि त्यांच्या दोन मुलांवर प्राणघात हल्ला केला. या हल्ल्यात नगरसेवक अजित कच्ची आणि त्यांचे दोन्ही मुले गंभीरित्या जखमी झाली आहेत.
अजित कच्ची यांच्या एका मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढी उपचारासाठी अंबाजोगाई स्व.रा.ती.शासकीय दवाखान्यात हलवण्यात आले आहे. या अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास परळी पोलिस करत आहेत.












