घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

महिला न्यायाधीशांच्या प्रश्नावर अशोक खरातची बोलती बंद, कोर्टात काय घडलं?

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तिसऱ्या गुन्ह्यात ही कोठडी सुनावली आहे. यावेळी कोर्टात महिला न्यायाधीशांनी विचारलेल्या एका प्रश्नावर अशोक खरातची बोलती बंद झाल्याचं बघायला मिळालं.

अशोक खरातला आता १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अशोक खरातच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.कोर्टात बाजू मांडताना तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तिसऱ्या प्रकरणातील फिर्यादी महिला 7 महिन्याची गरोदर असताना आरोपी खरातने तिच्यावर अत्याचार केला आहे.

आरोपीनं ईशान्यश्वर मंदिरात तिच्याकडून अघोरी पूजा करून घेतली. पीडित महिलेला मुलगाच होईल, असा विधी असल्याचं सांगितलं. धार्मिक विधीच्या नावाखाली पूजा केली. महेश कलंत्री नावाच्या व्यक्तीकडून अशोक खरातने नकली खडे आणून विकले. त्या व्यक्तीचा तपास करायचा आहे. तो महिलांना गुंगीचं औषध द्यायचा, ते काय आहे, याचा तपास करायचा आहे.

यासाठी 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात केली.खरातच्या वकिलाचा युक्तीवादअशोक खरातच्या वकिलाने कोर्टात केलेल्या युक्तीवादात म्हटलं की, यापूर्वी जी कारणं होती तिचं कारणं पुन्हा सांगितली जात आहेत. खडे, कातडी याबाबत ऑलरेडी तपास झाला आहे.

आरोपीनं गुन्हा कबुल केला असं तपास अधिकारी म्हणतात, तर मग आता त्यांना काय शोधायचं आहे. विशेष म्हणजे खरातने गुन्हा कबुल केला नाही. मग त्यांचा शोधायचा उद्देश काय आहे? असा सवालही आरोपीच्या वकिलाने उपस्थित केला.

यावेळी कोर्टातील महिला न्यायाधीशांनी अशोक खरातला विचारलं की, काही सांगायचं आहे का? यावर अशोक खरातची बोलती बंद झाली. त्याने मान खाली घालून ‘नाही.. मॅडम’ असं उत्तर दिलं. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टानं आरोपी खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें