घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेची तीन महिन्यांची मोहीम

शहरातील वाढत्या मालमत्ता कर थकबाकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पुढील तीन महिन्यांत व्यापक वसुली मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांकडून मालमत्ता कराची वसुली करण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या अर्थसंकल्पीय महासभेत दिली.कर वसुलीशिवाय विकासकामे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

२०२५-२६ या आर्थिक वर्षात ८७६ कोटींची विक्रमी करूनही महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरातील १ लाख ५८ हजार २५१ मालमत्ताधारकांकडे तब्बल २,९१५ कोटी ८६ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मूळ कराची रक्कम १,१२७ कोटी ७३ लाख रुपये असून दंड व व्याजाचा आकडा १,७१८ कोटी १२ लाख रुपयांवर गेला आहे.म्हणजेच थकीत करापेक्षा दंड व व्याजाचा बोजा अधिक झाल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर महसूल वसुली यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महासभेत सदस्यांनी या विषयावर प्रशासनाला जाब विचारत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. कर भरणाऱ्यांपेक्षा कर टाळणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, विकासकामांच्या निधीवरही त्याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.

त्यावर उत्तर देताना आयुक्तांनी, विशेष पथके तयार करून थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येईल तसेच मोठ्या थकबाकीदारांकडून वसुलीला प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले.

शासकीय संस्थाही थकबाकीदारथकबाकीदारांच्या यादीत शासकीय संस्थांचाही समावेश असल्याची बाबही सभागृहात पुढे आली. सिडकोकडे सुमारे २४७ कोटी, रेल्वेकडे ३७ कोटी आणि वीज विभागाकडे १५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

याशिवाय शहरातील सुमारे १,२०० मोबाइल टॉवरकडून ३८७ कोटी रुपये थकीत असून, अनधिकृत बांधकामांमधील ३८ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांकडे सुमारे २५२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या घटकांकडून वसुली करताना प्रशासनास अडचणी येत असल्याचेही नमूद करण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें