राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या विमान लँडिंगवेळी मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे.
छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे पुण्यामध्ये हेलिपॅड सोडून पार्किंगमध्ये लँडिग केल्याची घटना घडली आहे. पायलटच्या चुकीमुळे हा गंभीर प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून छगन भुजबळ मोठ्या अपघातातून बचावलेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छगन भुजबळांचे हेलिकॉप्टर पायलटने हेलिपॅड ऐवजीं चक्क कार पार्किंगमधे उतरवण्याच्या प्रकार घडला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडीमधे महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला छगन भुजबळ पोहचत होते. त्यासाठी भुजबळांचे हेलिकॉप्टर खानवडी गावात पोहचले.
हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड वेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आले होते. मात्र कार पार्किंगमधील मोकळी जागा पाहून पायलटला इथेच हेलिपॅड असावं असं वाटलं आणि त्याने तीथे हेलिकॉप्टर उतरवले. त्यानंतर पोलिसांनी पायलटला याची कल्पना दिल्यानंतर ते हेलिकॉप्टर तिथून हलविण्यात आले.












