शिक्षण विभागाच्या प्रोग्रेसिव्ह असेसमेंट टेस्टसाठी (पॅट) शाळांना विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अपुऱ्या प्रश्नपत्रिका मिळाल्याचे पुन्हा समोर आले आहे. शनिवारपासून (ता. ११) परीक्षा सुरू होत असून, प्रश्नपत्रिकांचा तुटवडा असल्याने परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्न शाळांसमोर निर्माण झाला आहे.
राज्यात ११, १५ आणि २२ एप्रिलदरम्यान इयत्ता दुसरी ते आठवीसाठी ‘पॅट-३’अंतर्गत संकलित चाचणीचे आयोजन केले आहे.दहा माध्यमांत होणाऱ्या परीक्षेत प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी विषयांचा समावेश आहे.
मात्र, अनेक शाळांमध्ये पटसंख्येपेक्षा कमी प्रश्नपत्रिका पोहोचल्या आहेत. शनिवारी सर्व माध्यमांच्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा चाचणी होणार आहे. अनेक शाळांना चाचणीच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत अपुऱ्या आल्या आहेत.
अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत ‘पॅट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पुन्हा अपुऱ्या आल्या आहेत. दरवर्षी हा प्रकार होतो.
शिक्षण विभागाने पॅट परीक्षेचे नियोजन करण्यापूर्वी शाळांमधील इयत्तानिहाय विद्यार्थिसंख्येबाबत माहिती पडताळून पाहणे आवश्यक आहे.












