घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

आईपासून दुरावलेल्या तरसाच्या दोन पिल्लांना शेतकरी, वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने जीवदान

आईपासून दुरावलेल्या व अन्न,पाण्यावाचून गलित गात्र झालेल्या तीन महिन्याच्या तरसांच्या दोन पिल्लांना नारायणवाडी येथील शेतकरी, आपदा मित्र सुशांत भुजबळ व वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांच्यामुळे जीवदान मिळाले.या पिल्लांना आज दुपारी माणिक डोह येथील निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

आईपासून दुरावलेली तरसाची दोन पिल्ले येथील नारायणवाडी येथील एकनाथ कोकाटे यांच्या घराजवळील शेतात मागील चार दिवसापासून अन्न पाण्याच्या शोधात आढळून आली. येथील शेतकऱ्यांना या पिल्लांना पाणी व दूध दिले. या पिलांची आई येत नसल्याने याबाबतची माहिती येथील शेतकऱ्यांनी आपदा मित्र सुशांत भुजबळ व वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांना दिली.

वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण,वनपाल अनिता होले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी घटनास्थळी जाऊन अशक्त झालेली दोन्ही पिल्ले ताब्यात घेतली. आज दुपारी या पिलांना माणिकडोह येथील निवारा केंद्रात दाखल केले.

डॉ.अविनाश विसलकर, डॉ. महेंद्र ढोरे यांनी या पिलांवर प्राथमिक उपचार केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पिलांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. पिल्लांची आई दगावल्याने तरसाची पिल्ले निराधार झाली होती. या पिलांपैकी एक नर व एक मादी आहे. अशी माहिती वनरक्षक पवार यांनी दिली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें