धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा येथील महाकाली कला केंद्रावर पुन्हा एकदा राडा झाला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या वादात तलवारी, कोयते आणि रॉडचा वापर करण्यात आला असून, नाचकाम करणाऱ्या महिलांनाही बेदम मारहाण करण्यात आली आहे.
या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाने टोक गाठले. संशयित आरोपींनी हातात कोयते, लोखंडी रॉड आणि तलवारी घेऊन कला केंद्रावर धुमाकूळ घातला. यावेळी कला केंद्राची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली.
धक्कादायक बाब म्हणजे, नाचकाम करणाऱ्या महिलांनाही मारहाण करण्यात आली असून यात काही महिला जखमी झाल्या आहेत. पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हल्लेखोरांनी त्यांच्या गळ्याला कोयता लावून जवळील रोख रक्कम आणि अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले.दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपया प्रकरणात दोन गट आमनेसामने आले आहेत.
काही तरुणांनी कला केंद्रात येऊन महिलांना मारहाण केली आणि तोडफोड करून लूटमार केली, असा आरोप करण्यात येतोय. तर दुसऱ्या बाजूलायेडशी गावातील एका तरुणाला कला केंद्र चालकांनी विनाकारण मारहाण केली होती.
त्याचा जाब विचारण्यासाठी गावातील तरुण गेले असता, कला केंद्र चालकांनीच त्यांना मारहाण केल्याचा आरोप दुसऱ्या गटाने केला आहे.आठ जणांवर गुन्हा दाखलयेरमाळा पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत ८ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि इतर कायद्यांच्या कलम ३३३, ११९(१), ११८(२), ११५, ३५२ सह इतर संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.












