घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेच्या संचालक पदी भरत रांजणे यांची बिनविरोध निवड : स्व तुकाराम घाडगे भाऊ यांच्या विचारांना अभिप्रेत काम करणार : रांजणे

पांचगणी, ता. 11: दापवडी (ता. जावली) येथील कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था काटवलीच्या रिक्त झालेल्या संचालक पदावर आज भरत आत्माराम रांजणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल रांजणे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ संचालक आणि माजी चेअरमन तुकाराम रामचंद्र घाडगे यांचे नुकटेच निधन झाले. त्यांचे झालेल्या रिक्त जागेवर आज नव्या संचालकांच्या निवडीसाठी आज संस्थेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अक्षय चव्हाण अध्याशी अधिकारी तथा कनिष्ठ लिपिक अधीन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मेढा हे होते तर सभेच्या अध्यक्ष स्थानी चेअरमन रविकांत बेलोशे हे होते तर यावेळी व्हा चेअरमन हरिश्चंद्र गावडे, संचालक बाबुराव रांजणे, प्रकाश रांजणे , मधुकर पवार, भीमराव खरात, रामचंद्र बेलोशे, रामदास रांजणे, व्यवस्थापक अनिल रांजणे आदी उपस्थित होते. रिक्त झालेल्या जागेसाठी विहित वेळेत भरत रांजणे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने भरत रांजणे यांची या पदावर बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय चव्हाण यांनी जाहीर केले. या निवडी नंतर भरत रांजणे यांचा अक्षय चव्हाण यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तर रविकांत बेलोशे यांचे हस्ते अक्षय चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

निवडीनंतर नवनिर्वाचित संचालक भरत रांजणे यांनी सांगितले स्व तुकाराम घाडगे यांच्या जागेवर माझी निवड होणे हे मी माझे भाग्य समजतो. संस्थेसाठी भाऊनी दिलेले योगदान लाखामोलाचे आहे. तुकाराम घाडगे यांचे प्रमाणेच मी माझ्या कामाची दिशा संस्थेच्या प्रगती साठी जास्तीत जास्त देणार असल्याची ग्वाही दिली. बाबुराव रांजणे यांनी स्वागत केले यावेळी सरपंच महादेव रांजणे, माजी सरपंच संतोष रांजणे, बापूराव रांजणे गुरुजी, काळू पाटील तसेच करहर शाखा प्रमुख शंकर गोळे, पांचगणी शाखा प्रमुख प्रकाश रांजणे, भोसे शाखा प्रमुख लक्ष्मण ओंबळे, वसुली अधिकारी अजित बेलोशे, शामराव रांजणे,रामदास गलगले, श्रीमती सुनीता राजपुरे आदी उपास्थित होते. या निवडीबद्दल भरत रांजणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रविकांत बेलोशे यांनी आभार मानले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें