घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संयुक्त अभिवादन

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, पुणे’ यांच्या वतीने मंगळवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य ‘संयुक्त अभिवादन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात राज्य व केंद्र सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत.या सोहळ्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, पार्थ पवार, मेधा कुलकर्णी यांच्यासह पुण्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा हे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय विविध पक्षांचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (काँग्रेस), धिरज घाटे (भाजप), सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस), गजानन थरकुडे (शिवसेना उ.बा.ठा.), रवींद्र धंगेकर (शिवसेना) आणि श्रीकांत पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) हेही उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे नियोजन उपमहापौर परशुराम वाडेकर, अध्यक्ष राहुल डंबाळे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक अविनाश साळवे आणि बाळासाहेब जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

पुणे शहर व परिसरातील नागरिकांनी या अभिवादन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन करावे, असे आवाहन जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें