घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

डहाणू लोकलमध्ये शेवटचा प्रवास, तरुणानं अख्खा डब्याला दिली फेअरवेल पार्टी,

मुंबई लोकलनं प्रवास करताना सहप्रवाशांसोबत एक अतुट नातं निर्माण होतं. ही आपुलकी किती खास असते, हे तुम्ही या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता. डहाणू लोकलमधून शेवटचा प्रवास करताना एका तरुणाने सहप्रवाशांना निरोप देताना पार्टी दिली.

हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील भावुक व्हाल.घड्याळ हे मुंबईकरांच्या मनगटाला नव्हे तर नशिबाला बांधलेलं असतं, असं म्हटलं जातं. कारण एक मिनिट उशीर झाला तर नेहमीची ट्रेन सुटलीच म्हणून समजा. आणि मग संपूर्ण दिवसाचं गणित बिघडतं. त्यामुळे जर तुम्ही मुंबई लोकलनं प्रवास केला, तर तुमच्या लक्षात येईल की लोक ठराविक ट्रेनमध्ये ठराविक डब्यातच चढताना दिसतात.

अगदी पुढचा डबा मोकळा असला तरी लोक आपला नेहमीचा डबा सोडत नाहीत.असो, पण सवयीमुळे सहप्रवासी हे तुमच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनतात. लोक एकमेकांशी यथेच्छ भांडतात, हाणामाऱ्या सुद्धा करतात. पण त्यांच्यामध्ये कळत नकळत एक आपुलकीचं नातं निर्माण होतं. आणि ती ट्रेन जेव्हा सोडायची वेळ येते, तेव्हा लोक भावुक होतात.

काही लोक ढसाढसा रडतातदेखील.असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. डहाणू लोकलमधून शेवटचा प्रवास करताना एक तरुण भावुक झाला. त्यानं डब्यातील सर्व प्रवाशांना चहा, नाश्ता आणि कोल्डड्रिंक्सची पार्टी दिली. सहप्रवाशाला निरोप देतानाचा हा क्षण सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडीओ Instagram वरील sohaib_ansari_07 या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही डहाणू लोकलनं प्रवास करणारे प्रवासी पाहू शकता. या डब्यातील एक प्रवासी या लोकलमधून शेवटचा प्रवास करत होता. कामानिमित्त त्याची बदली झाली असून तो दुसऱ्या ठिकाणी राहायला जात आहे.

परिणामी, तो आता आपल्या नेहमीच्या डहाणू लोकलनं प्रवास करणार नाही. त्यामुळे तो भावुक झाला. दरम्यान, शेवटच्या प्रवासाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.लक्षवेधी बाब म्हणजे डब्यातील सर्व प्रवासी त्याच्यासाठी आनंदी होते. पण तो पुन्हा या ट्रेनने प्रवास करणार नाही, यामुळे ते भावुकही झाले होते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें