घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

एका तरुणाचे ६ तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ व्हायरल !

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच, जिल्ह्यातील परतवाडा येथे एका १९ वर्षीय तरुणाचे सहा वेगवेगळ्या तरुणींसोबतचे अश्लील (न्यूड) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने तपास चक्रावून संशयितना कारवाईच्या टप्प्यात आणले आहे.या धक्कादायक प्रकारानंतर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, अमरावती ग्रामीण पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करून संबंधित नराधमाला अटक करावी, अशी मागणी केली आहे.अमरावती ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या १९ वर्षीय तरुणाची आणि हे व्हिडिओ टेलिग्रामवर व्हायरल करणाऱ्या त्याच्या मित्राची ओळख पटवली आहे.

हे दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात असून कुण्या पीडिता वा तिच्या कुटुंबातील कुण्या सदस्याने तक्रार दिल्यास त्यांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असे संकेत मिळत आहेत.व्हिडिओमधील तरुणी अल्पवयीन असण्याची शक्यता आहे.

पीडितांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे. तक्रारदार आणि पीडितांची नावे पूर्णपणे गोपनीय ठेवली जातील, असे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले.

व्हिडिओ व्हायरल करणारा तरुण हा मुख्य आरोपीचा मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाईची मागणी करणार आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें