घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

लोक पाहत होते अन् तिने कोयत्याने त्याचं डोकं तोडलं

‘नाशिक कायद्याचा किल्ला’ असं आरोपीकडून वदवून घेताना नाशिक पोलिसांचा व्हिडीओ पाहिले असतील, पण गुन्हा घडल्यावर असे व्हिडीओ बनवणाऱ्या नाशिक पोलिसांचा खरंच धाक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थितीत करणारी घटना घडली आहे.

भर रस्त्यावर एका इसमाचा खून करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, एक महिलेनं या इसमाच्या तोंडावर कोयत्याने सपासप वार केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील विल्होळे परिसरात ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. रस्त्याच्या बाजूला एक महिला आणि पुरुषाने एका इसमावर हल्ला केला. त्यानंतर त्याचा खून केला. धक्कादायक म्हणजे, हा इसम मृत झाल्यानंतर महिलेनं कोयत्याने या इसमाच्या तोंडावर एकापाठोपाठ ३ वार केले. त्यानंतर तिथून निघून गेले. हा सगळा प्रकार तिथेच उपस्थितीत असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ज्या इसमाचा खून झाला आहे, त्याच्यावर आधी या महिलेनं आणि पुरुषाने मिरचीची पूड टाकून हल्ला केला. इसमाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, त्यानंतर दोघांनी एकत्र हल्ला केला. सुरुवातीला या इसमाच्या डोक्यात दगड घातला. तो इसम खाली पडल्यानंतर मानेवर आणि डोक्यात कोयत्याने सपासप वार करण्यात आले. हा प्रकार इथंच थांबला नाही, कर या महिलेनं कोयत्याने इसमाच्या चेहऱ्यावर कोयत्याने ३ वार केले. या भयानक हल्ल्यात इसमाचा जागेवरच मृत्यू झाला.

या इसमाची हत्या केल्यानंतर दोघेही जण दुचाकीवर बसून फरार झाले. पण, तिथून पळून जात असताना बाईकची नंबर प्लेट ही झाकलेली होती. आपल्या बाईकचा नंबर कोणता आहे हे कळू न देण्यासाठी दोघांनी हे कृत्य केलं. घटनास्थळावरून दोघे फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेह आणि हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. पण, भर दिवसा झालेल्या या हत्याकांडामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें