घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

बोरघाटात टँकरने संपूर्ण सिस्टिमला घाम फोडला!

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात वाळक्याच्या मोरीजवळ एका केमिकल टँकरचा अपघात झाला. धोकादायक केमिकल असल्याने प्रशासकीय यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली. टँकरवर बेंझिन असं मोठ्या अक्षरात लिहिलं असल्याने आणि हे रसायन अत्यंत ज्वलनशील असल्याने मोठा अनर्थ ओढवणार, पोलिसांनी काही अंतरापर्यंत हा घाटात वाहतूक रोखून ठेवली होती.

सोमवारी दुपारी वाळक्याच्या मोरीजवळ एका अवघड चढणीवर हा टँकर चढत होता. मात्र, अचानक ब्रेक फेल झाल्याने टँकर पाठीमागे घसरत आला आणि रस्त्यावरच उलटला. टँकरच्या पुढच्या बाजूला बेंझिन असा उल्लेख असल्याने यात कोणतं धोकादायक केमिकल तर नाही अशी भीती निर्माण झाली.

गेल्याच महिन्यात आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटून जो गोंधळ उडाला होता, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंत्रणांनी कंबर कसली.यंत्रणांची हायअलर्टवरअपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, फायर ब्रिगेड, डेल्टा फोर्स, आयआरबी पेट्रोलिंग आणि हेल्प फाउंडेशनच्या टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. कोणतीही ठिणगी पडून आग लागू नये, यासाठी अत्यंत सावधगिरीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

इतकंच नाही तर तातडीने केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध यांनाही पाचारण करण्यात आलं.बेंझिन नाही, तर निघालं खाद्यतेल!केमिकल एक्सपर्ट घटनास्थळी आले आणि त्यांनी गळती झालेल्या द्रवाची तपासणी केली. तेव्हा धक्कादायक पण दिलासादायक बाब समोर आली.

टँकरवर जरी बेंझिन असं लिहिलं होतं, तरी प्रत्यक्षात त्यामध्ये इडिबल ऑईल म्हणजेच खाण्याचं तेल होतं. टँकरमधील रसायनाचा उल्लेख जुना असावा किंवा चुकीचा असावा, पण ते तेल असल्याचं स्पष्ट होताच यंत्रणांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

वाहतूक सुरळीत, चालक जखमीया विचित्र अपघातात टँकर चालक जखमी झाला असून त्याला तातडीने खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यंत्रणांनी तातडीने क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें