घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती

पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे. बोपोडी परिसरात उभारण्यात आलेली महाबोधि विहार, बोधगया येथील विहाराची तब्बल ४० फूट उंच प्रतिकृती नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

या देखाव्याचे उद्घाटन भन्ते नागघोष यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थित भिक्षू संघांनी बौद्ध मंत्रोच्चार करून वातावरण भक्तिमय केले. मोठ्या संख्येने नागरिकांनी या देखाव्याला भेट देत अभिवादन केले.ही भव्य प्रतिकृती पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर आणि माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे.

आकर्षक प्रकाशयोजना, देखणी सजावट आणि सूक्ष्म कलाकुसरीमुळे या प्रतिकृतीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. उद्घाटन प्रसंगी रिपाईचे शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष  अविनाश कदम, नगरसेवक सनी निम्हण, सपना छाजेड, भक्ति गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते. 

आंबेडकर जयंतीनिमित्त बोपोडी परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या भव्य देखाव्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून महाबोधि विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी ही भव्य प्रतिकृति उभारली आहे. तसेच या प्रतिकृतीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजूषा नागपुरे भेट देणार असल्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें