नाशिकमधील अशोक खरातचे प्रकरण, त्याचे काळे कारनामे समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर मोठ्या संकटात सापडल्या आहेत. खरातशी जवळचे संबंध असल्याकारणाने आणि खरातच्या ईशान्येश्वर मंदिराच्या विश्वस्तपदी असल्याकारणाने चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला आहे.
परंतु, आता चाकणकर आणि खरातचे संबंध किती घनिष्ठ होते? याबाबतचा खुलासा करणारा आणखी एका पुरावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून देण्यात आला आहे. खरातला कॉल करणाऱ्या पहिल्या 10 जणांच्या यादीत रुपाली चाकणकर यांचा नंबर दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा एक कॉल हा 122 मिनिटांचा असल्याचा खुलासा दमानियांकडून करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी (ता. 15 एप्रिल) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुपाली चाकणकर यांचे भोंदू अशोक खरातसोबत फोनवर किती वेळा बोलणे झाले? याबाबत माहिती दिली. तसेच, खरातला सर्वाधिक फोन करणाऱ्या 10 जणांच्या यादीत रुपाली चाकणकर यांचा दुसरा क्रमांक असल्याचेही यावेळी दमानियांनी सांगितले.
याबाबत त्यांनी म्हटले की, अशोक खरात यांना फोन कॉल करणाऱ्यांमध्ये त्यांची मुलगी तृप्ती पहिली आहे. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकरांचा नंबर आहे. तिसऱ्या क्रमांकावर दीपक लोढे, चौथ्या नंबरवर कल्पना, खरातांची बायको आहे. पण अजून एक महत्वाचे नाव आहे. त्याच्या चौकशीची मी एसआयटीकडे मागणी करणार आहे. प्रॉपर्टी, पैशाचे व्यवहार, एमआयडीसीची जमीन घेण्यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी जवळच्या लोकांनी मदत केली, त्यांची नाव वाचून दाखवलीत, असे दमानियांनी सांगितले.
तसेच, यात खरातांना कॉल करण्यात तिसऱ्या नंबरवर असलेले दीपक लोंढे हे दीपक केसरकरांच्या जवळचे आहेत. त्यांनी 189 कॉल्स केले आहेत. बाळासाहेब बोराडे यांनी 156 नंदकिशोर काटोर डॉक्टर आहेत. सचिन सुंबाळे 177 कॉल्स, नंदकिशोर यांनी 106 कॉल्स केले. राहुल देशमुख, अविनाश पोटे, महेंद्रशेळके पाटील यांचा रोल तपासला जावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
तर, धक्कादायक बाब अशी की, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, पीआय, नाव बघून मी हैराण होते. का यांनी खरातला शेकडो फोन कॉल्स केले? चाकणकर म्हणाल्या माझा काही हात नाही. महिला आयोगाकडून नोटीस पाठवून 9 तासात सुनावणी घेतली.
इतकी काय घाई झालेली खरातची प्रकरणं संपवण्याची? याची चौकशी झाली पाहिजे. एसआयटीने त्यांना खरंतर ताबडतोब बोलवायला पाहिजे होती. सगळ्या राजकारण्यांना शो कॉज नोटीस पाठवली पाहिजे. हे सर्व चुकीच आहे. असेही यावेळी अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले.












