घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नवनियुक्त अश्विनी भिडे अ‍ॅक्शन मोडवर; दोन अधिकाऱ्यांना पदोन्नती, तर सहा जणांची बदली

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेच्या आयुक्त झाल्यानंतर अश्विनी भिडे यांनी चौथ्याच दिवशी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावत निर्देश दिले होते. यानंतर आज (15 एप्रिल) त्यांनी महानगरपालिकेतील दोन अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे, तर सहा अधिकाऱ्यांची बदली केली आहे.

महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते आणि सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू यांना पदोन्नती दिली आहे. सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांची महानगरपालिका उप आयुक्त (विशेष) या पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

तसेच सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू यांची हंगामी महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ – 7) या पदावरून नियुक्त करण्यात आली आहे. याशिवाय सहा अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांची सहाय्यक आयुक्त (बाजार) पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे सहाय्यक आयुक्त (सी विभाग) पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

तसेच सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांची विनायक विसपुते यांच्या उप आयुक्त पदावरील पदोन्नतीने रिक्त झालेल्या सहाय्यक आयुक्त (जी/उत्तर) पदी बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.सहाय्यक आयुक्त संतोष साळुंके यांची मनिष वळंजू यांच्या उप आयुक्त पदावरील पदोन्नतीने रिक्त झालेल्या सहाय्यक आयुक्त (डी विभाग) पदी बदलीने पदस्थापन करण्यात आली असून त्यांच्याकडे सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) शहर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

उप प्रमुख अभियंता जितेंद्र घोराडे यांच्याकडे सहाय्यक आयुक्त (बी विभाग) पदाचा पूर्णकालिका कार्यभार सोपविण्यात आला आहे. सह आयुक्त (परिमंडळ – 5) देविदास क्षीरसागर यांची सह आयुक्त (वित्त) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) संध्या नांदेडकर यांची उप आयुक्त (परिमंडळ – 5) पदी नियुक्त करण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें