घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

महाराष्ट्र बँकेसमोर दिवसाढवळ्या ८ लाखांची बॅग हिसकावली

वरवंड (दौंड) येथील महाराष्ट्र बँकेसमोर दिवसाढवळ्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी एका दुचाकीस्वाराकडील तब्बल ८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ३०) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी नंदकुमार गदादे (रा. केडगाव, ता. दौंड) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गदादे हे आपल्या मालकाचे (ठेकेदार) ११ लाख रुपये बँकेत भरण्यासाठी आले होते. मात्र, मालकाने अचानक तीन लाख रुपयेच बँकेत भरण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गदादे यांनी बँकेत तीन लाख रुपये भरले आणि उरलेले सात लाख ९० हजार रुपये बॅगेत घेऊन बाहेर पडले.

बँकेबाहेर उभी असलेल्या दुचाकीकडे जात असताना त्यांची दुचाकी पंक्चर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पैशांची बॅग दुचाकीच्या हँडलला अडकवून ते दुचाकी ढकलत पुढे जात होते. त्याचवेळी पाठीमागून हेल्मेट घालून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अचानक गदादे यांच्या दुचाकीवरील पैशांची बॅग हिसकावली आणि क्षणात पलायन केले. गदादे यांना काही कळण्याआधीच चोरटे घटनास्थळावरून फरार झाले.

गदादे यांनी आरडाओरडा केला असता, आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. वर्दळीच्या ठिकाणी, भरदिवसा चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने, तसेच पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची बारकाईने पाहणी केली.

आजूबाजूच्या दुकानांतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीचा प्रकार कैद झाल्याचे समोर आले आहे.गदादे यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे यवत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें