घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*७३ व्या वर्षीही जलतरणात सुवर्णझळाळी

सुपर मास्टर गेम्स अँड स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राष्ट्रीय मास्टर गेम्स स्पर्धेत महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी करत पुणे जिल्ह्यातील मोशी येथील केंद्रीय विहार सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक रमेश जाधव (वय ७३) यांनी जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे पुढील वर्षी जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर गेम्स स्पर्धेसाठी त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.

ही राष्ट्रीय मास्टर गेम्स स्पर्धा २३ विविध खेळांच्या सहभागासह मोठ्या उत्साहात पार पडली. जलतरण स्पर्धा २८ व २९ जानेवारी रोजी पिंपरी येथील आण्णासाहेब मगर स्टेडियममधील जलतरण तलावात घेण्यात आल्या. ७० वर्षांवरील पुरुष वयोगटातील स्पर्धांमध्ये रमेश जाधव यांनी अंतिम फेरीत दमदार कामगिरी करत एकूण चार पदके जिंकली.

रमेश जाधव यांनी २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्ण पदक, २०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात रौप्य पदक, तर १०० मीटर आणि ५० मीटर फ्री स्टाईल प्रकारात प्रत्येकी एक ताम्र पदक पटकावले. ७० वर्षांपुढील पुरुष वयोगटात चार पदके जिंकणारे रमेश जाधव हे महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धक ठरले आहेत.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुपर मास्टर गेम्स अँड स्पोर्ट्स फेडरेशनचे कार्यकारी अधिकारी विनोद कुमार, महाराष्ट्र अध्यक्ष रामसिंग संघा तसेच सरचिटणीस शैलेश फुलसुंगे यांच्या हस्ते रमेश जाधव यांचा पदक देऊन सन्मान करण्यात आला.

रमेश जाधव हे केंद्र सरकारच्या भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ संचालित प्रवरानगर येथील जैविक नियंत्रण केंद्रामध्ये कीटकशास्त्रज्ञ (वर्ग १) या पदावरून निवृत्त झाले आहेत. तरुण वयापासूनच त्यांना पोहण्याची विशेष आवड असून, त्याच जिद्द आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे.

यापूर्वी २००५ साली प्रवरानगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी जलतरण स्पर्धेत ताम्र पदक पटकावले होते. तसेच २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ६ व्या महाराष्ट्र राज्य मास्टर गेम्स स्पर्धेत त्यांनी एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदके जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.

७३ व्या वर्षीही क्रीडाक्षेत्रात उत्तुंग यश मिळवत रमेश जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून, आता जपानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर गेम्स स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें