ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक ३० मधून ‘एमआयएम’च्या तिकीटावर निवडून आलेली नगसेविका सहर शेख नव्या वादात सापडली आहे. निवडणूक लढण्यासाठी सहर शेखने एकूण चार महत्त्वांच्या कार्यालयांना फसवून बोगस जातीचा दाखला बनवल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे सहर शेखच्या नगरसेवक पदावर गंडांतर आलं आहे. हे प्रकरण समोर येताच सहर शेख आणि तिचे वडील यूनुस शेख हे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.मुंब्र्यातून निवडून आल्यावर ‘कैसे हराया..’ या वक्तव्याने सहर शेख देशातील कानाकोपऱ्यात पोहोचली होती. त्यानंतर सहर शेखला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागता होता.
यातच आता सहर शेखने बोगस जातीचा दाखल्याच्या आधारे निवडणूक लढली असल्याचं उघडकीस आलं आहे. हे प्रकरण समोर येताच सहर शेख आणि तिचे वडील यूनुस शेख ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. सहर शेख आणि यूनुस शेख हे मुंब्र्यातील कार्यालयात देखील नसल्याचं समोर आलं आहे. तसेच, माध्यमांच्या प्रतिनिधींचे फोनही सहर शेख आणि युनूस शेख यांनी घेणे टाळले आहेत.
सहर शेखचे वडील यूनुस शेख हे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे मूळ रहिवासी असून महाराष्ट्रात स्थलांतरीत झाले. शेख हे स्थलांतरीत असून त्यांना नमुना-१० लागू असताना नमुना-८ वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला. याच दाखल्याच्या आधारे सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले होते.
त्यामुळे शेख यांच्या जातीच्या दाखल्याची पडताळणी करण्याबाबत ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्धीकी फरहा सबाब अहमद यांनी तक्रार दाखल केली होती.ठाण्याच्या तहसीलदारांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने १८ मार्च रोजी सुनावणी घेतली होती. त्या सुनावणीला युनूस शेख हे आजाराचे कारण देत गैरहजर राहिले होते.
पण, शेख यांच्या वकिलांनी जात दाखल्याची रंगीत छायाप्रत आणि काही कागदपत्रे सादर केली होती. त्याच्या पडताळणीसाठी पुन्हा २३ मार्चला सुनावणी घेण्यात आली.या सुनावणी ठाण्याच्या तहसीलदारांनी शेख यांच्या जात दाखल्यातील त्रुटी काढल्या.
ठाण्याचे रहिवासी असतानाही सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका तहसीलदारांनी उपस्थित केली.यंत्रणांना फसवलंयूनुस शेख आणि सहर शेख यांनी ठाणे उपविभागीय कार्यालय अधिकारी, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर जात पडताळणी वैधता समिती आणि राज्य निवडणूक आयोग, अशा चार महत्त्वाच्या कार्यालयांना फसवलं आहे.आक्षेप कशावर?छायाप्रत दाखल्याच्या शीर्षकात महाराष्ट्र शासनांना उल्लेख आढळला नाही. दाखल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाही.
यूनुस शेख यांच्या रहिवाशी दाखवल्यावर वडिलांच्या नावात बदल आहे. शेख यांच्या काकांचा जातीचा दाखल गाझियाबादचा आहे. स्थलांतरित अधिनियम २००० चे कलम ६ मधील नमुना-१० चा अभाव आहे.नगरसेवकपद धोक्यात…संबंधित दाखल्याची चौकशी होऊन युनूस शेख यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यासह युनूस शेख आणि मुलगी सहर शेख यांचे जातीचे दाखल रद्द देखील होऊ शकतात.त्यामुळे सहर हीचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.
सहरची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेतहे प्रकरण समोर येताच सहर शेखने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यात ती म्हणते, “द्वेष करणारे मोठे असले तरी माझा विश्वास त्यापेक्षा मोठा आहे. माझ्याविरोधात ते कट रचत आहेत. पण, अल्लाहने माझ्या नशिबात विजय लिहिलाय. तुम्ही हजार वेळा प्रयत्न केला तरी अल्लाह ज्यांचं रक्षण करतो, त्याला कुणीच हरवू शकत नाही. कठीण काळात प्रत्येकाला हेच सांगेन की आशा सोडू नका, विश्वास ठेवून पुढे वाटचाल करा…”












