घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जिल्हा परिषद शाळा नागेवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहातवाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद शाळा नागेवाडी येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व प्रख्यात शाहीर शरद यादव होते. आपल्या मनोगतात त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी पदवीधर शिक्षिका भोसले मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाची प्रेरणादायी माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यांनी सामाजिक समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची जाणीव करून दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर प्रभावी भाषणे केली. काही विद्यार्थ्यांनी कविता व घोषवाक्ये सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “भीम ज्योती”चे शाळेत स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या ज्योतीचे स्वागत करत अभिवादन केले. कार्यक्रमामुळे संपूर्ण शाळा परिसर प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाच्या शेवटी भोसले मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
जिल्हा परिषद शाळा नागेवाडी ही शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात. शाळेचे मुख्याध्यापक शाहीर शरद यादव हे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी पोवाडे, राष्ट्रीय संतांचे पोवाडे तसेच प्रेरणादायी गीतांचे प्रशिक्षण देत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव, आत्मविश्वास आणि वक्तृत्व कौशल्य विकसित होत असल्याचे दिसून येते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें