घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

भीम फेस्टिवल २०२६ : बावधनमध्ये उत्साहात साजरी आंबेडकर जयंती

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विकास प्रतिष्ठान, बावधन व सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भीम फेस्टिवल २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला.

१४ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या सोहळ्यात महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाला पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे यांनी उपस्थिती लावून जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या

त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचा सत्कार बावधन गावचे माजी सरपंच कु वैशालीताई कांबळे, उमेश कांबळे, सुषमाताई कांबळे तसेच युवा उद्योजक निखिल बांदल यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाला बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच अशोक डोंगरे, पश्चिम महाराष्ट्र मंडप असोसिएशनचे अध्यक्ष विजय दगडे पाटील, युवा नेते राहुल दगडे पाटील यांच्यासह बावधन परिसरातील हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सर्व उपस्थित मान्यवरांचे विकास प्रतिष्ठानच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या भव्य सोहळ्याचे आयोजन यशराज उमेश कांबळे यांनी केले होते.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें