घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

‘कोणीतरी ओढत नेतंय’? १८ वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता

धुळे शहरात एका १८ वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ती घराबाहेर पडतानाचे आणि त्यानंतरचे काही क्षण सीसीटीव्हीत कैद झाले असून, त्या दृश्यांमुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे.

धुळे जिल्ह्यातील सरकारी दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगर येथे राहणारी संजीवनी राहुल वराडे ही १७ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडताना दिसते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती वारंवार आजूबाजूला पाहताना दिसते. तिच्या हालचालींवरून ती चिंताग्रस्त आणि घाबरलेली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

थोड्याच वेळात एक वृद्ध व्यक्ती तिच्या जवळून जाताना दिसते. त्यानंतर संजीवनीच्या हालचाली अचानक बदलतात. ती अचानक चालू लागते. चालताना तिचा एक हात हवेत उचललेला दिसतो, जणू कोणीतरी तिचा हात धरून तिला ओढत नेत आहे, अशी भावना निर्माण होते. या दृश्यामुळे परिसरात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

या घटनेनंतर काहीजणांनी ‘हिप्नोसिस’द्वारे अपहरण झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्यांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांनीही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

माहितीनुसार, संजीवनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली असून, तिचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप तिचा ठावठिकाणा लागलेला नाही.दरम्यान, धुळे जिल्ह्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेण्याच्या घटना घडल्यामुळे या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहिले जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें