घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जळकोटमधील अर्धवट रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा

शहरातील पत्रकार भवन आणि बाजार समितीसमोरील मुख्य रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या जीवघेण्या खड्ड्यात लोखंडी सळ्या उघड्या सोडल्याने हा रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.

हा रस्ता रावणकोळा, हळदवाढवणासह अनेक गावे, शाळा, शासकीय रुग्णालय आणि बाजार समितीला जोडणारा मुख्य मार्ग असल्याने येथे २४ तास वाहनांची वर्दळ असते.मात्र, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे रुग्णवाहिका, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

येथे कोणतीही सुरक्षा चिन्हे किंवा बॅरिकेड्स नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वरांसाठी व पादचाऱ्यांसाठी अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते मुक्रम बंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

३० एप्रिलपर्यंत रस्ता पूर्ण न झाल्यास बाजार समितीसमोर झोळी घेऊन ”भीक आंदोलन” करण्यात येईल. नागरिकांकडून एक-एक रुपया गोळा करून हा रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असा इशारात्यांनी दिला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें