महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका 65 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेनंतर सीसीटीव्हीच्या आधाराने पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील म.प्र.येथील एका गावातून परतवाडा येथे उपचाराकरीता पायी जात असलेल्या 65 वर्षीय वृद्ध महिलेला अज्ञात आरोपीने, मी पण परतवाडा येथे जात आहे चला मी तुम्हांला माझ्या गाडीवर सोडतो असे म्हणून पीडित महिलेस स्वतःच्या दुचाकीवर बसवले आणि परतवाडाकडे निघाला. रस्त्यातच खरपी शिवारात रस्त्याच्या डावीकडे जाणाऱ्या पांदन रस्त्यावर निर्जन आणि एकांत ठिकाणी आरोपीने वृद्ध महिलेस मला इकडे एक काम आहे, चला आपण तिकडे जाऊ, माझे काम करून पूढे परतवाड्याला जाऊ, असे म्हणून महिलेस गाडीखाली उतरवून तिला पांदन रस्त्याकडे नेले आणि तिथे कोणीही नसल्याचा फायदा घेत वृद्ध महिलेशी बळजबरीने वारंवार संभोग केला आणि महिलेकडील तिच्या उपचाराकरीता असलेले 600 रुपये बळजबरीने काढून घेतले.
सदर घटनेदरम्यान गुन्ह्यातील पीडित महिलेला गंभीर दुखापत आरोपीने केली. आरोपीने पीडित महिलेस स्वतःचे दुचाकीवर ज्या मार्गाने नेले, त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी शिरजगाव कसबा पोलीसांनी केली आणि त्याला आज अटक केली असून आरोपीचे नाव आवेज खान युनुस खान, राहणार परतवाडा असे असल्याचे निष्पन्न झाले.












