घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

Nashik TCS कंपनीतील पीडित तरुणींनी इतका टोकाचा कॉर्पोरेट जिहाद का सोसला?

TCS कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडित तरुणीने सोसला कॉर्पोरेट जिहाद.

कॅन्सरग्रस्त वडिलांच्या किमोथेरेपीसाठी औषधं आणि पैशांची गरज असल्यानं पीडिता मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली, अशी सूत्रांची माहिती. दुसऱ्या पीडितेवर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं नोकरीच्या नावाखाली धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पडल्याची सूत्रांची माहिती.

आजारपणामुळे वडील अंथरुणाला खिळलेले, घरात अन्नाचा कण नाही, कुटुंबाच्या पोटाच्या भुकेसाठी पीडितीने सर्व सहन केले असं सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील जाणून घेतली पीडितांची आपबिती.काल TCSकंपनीत जाऊन देखील पथकाने तब्बल दीड तास चौकशी केली. कंपनीतील पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, कामाचे विभाग, कॅन्टीन, वेटींग रूमची केली पाहणी. आज सलग तिसऱ्या दिवशी महिला आयोगाकडून होणार या प्रकरणाची चौकशी.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमकडून गेल्या 2 दिवसापासून TCS प्रकरणी झाडाझडती सुरु आहे. महिलांवरील अत्याचार, विनयभंग व धर्मांतराच्या प्रयत्नांचा गंभीर आरोप आहेत.कॅन्टीन, वेटिंग रूमसह विविध विभागांची पाहणीराष्ट्रीय महिला आयोगाच्या चार सदस्यीय पथकाची नाशिकच्या TCS कंपनीत जाऊन प्रत्यक्ष भेट व तपास. पीडित महिलांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यास सुरुवात. TCS कंपनीतील कार्यालय, कॅन्टीन, वेटिंग रूमसह विविध विभागांची पाहणी.

आतापर्यंत या प्रकरणी 9 गुन्ह्यांची नोंद आहे. सुरक्षा व्यवस्था व महिलांसाठीच्या सुविधांचीही तपासणी. POSH अंतर्गत तक्रार समिती कार्यरत आहे का? याची देखील चौकशी केली. चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर होणार.निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणीची शक्यतानाशिक TCS प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणीची शक्यता. नाशिक न्यायालयात सुनावणीची शक्यता.

गेल्या काही दिवसांपासून निदा खान फरार आहे. TCS प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयित आरोपींना मदत केल्याचा निदा खानवर आरोप. गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांचे पथक निदा खानच्या शोधात आहे. निदा खान गरोदर असल्याची देखील माहिती आली होती समोर. निदा खानच्या वकिलानी अटकपूर्व जामीनसाठी नाशिक न्यायालयात अर्ज केला आहे. आजच्या सुनावणीत काय होणार? याकडे लक्ष.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें