घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कोठडीत अशोक खरात रडकुंडीला, ‘या’ आजारानं नराधम हैराण

बडे राजकारणी, अधिकारी लोकांसोबत उठबस, जादूटोणा-मंत्राच्या भीतीनं महिलांवर अत्याचार करणारा आणि लोकांची आर्थिक फसवणूक करणारा अशोक खरात हा आता तुरुंगात खचला असल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांनी सुरुवातीला अटक केल्यानंतर चौकशीत सहकार्य न करणारा खरात आता पोलिसांच्या प्रश्नाला निमूटपणे उत्तरं देत असल्याची माहिती समोर आली आहे.

स्वयंघोषित ‘कॅप्टन’ खरातवर आतापर्यंत महिला अत्याचाराचे ८, खंडणी, सावकारी आणि फसवणुकीचे ६, तर धमकावल्याचा १ असे एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

खरातची पाचव्या गुन्ह्यात पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.तपासात सहकार्य, पण मनस्थिती खचली१७ मार्चपासून सातत्याने पोलीस कोठडीत असलेल्या खरातचा तोरा आता पूर्णपणे उतरला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर अशोक खरात हा तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर आले होते. पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देत होता.

मात्र, पोलिसांनी त्याच्या भोवती तपासाचा आणि चौकशीचा फास आवळला. त्याशिवाय, त्याच्या पत्नीचाही पोलीस कसून शोध घेत आहेत. पोलिसांकडून पुरावे जमा केले जात आहेत. पोलिसांकडून कारवाई सुरू झाल्यानंतर आता खरातचा सूर नरमला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा खरात आता पोलिसांना तपासात सहकार्य करत आहे. मात्र, दीर्घकाळ कोठडीत राहिल्यामुळे त्याची मनस्थिती खालावली असून, तो खांदेदुखीने त्रस्त असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला.

पीडित विधवा महिलेवर अत्याचार….खरातविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका प्रकरणातील पीडित विधवा महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, खरातने तिला आपल्या कार्यालयात बोलावले होते.

तिथे तिला मिठाई खायला देऊन, “मी शंकराचा अवतार आहे, मी तुझी शुद्धी करत आहे,” असे भासवले. जर तिने शारीरिक संबंधांना नकार दिला, तर मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याची भीती त्याने घातली. या मानसिक दडपणाखाली त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें