घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात

कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाच्या बैठकीदरम्यान मोठा वाद उफाळून आला असून, गटनेत्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांना कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान काही मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला. या वादात जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांनी कांचन कुलकर्णी यांच्याशी कथितरित्या शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतापलेल्या कुलकर्णी यांनी त्यांना कानशिलात लगावल्याचे समोर आले आहे. या संदर्भात कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्षांनी शिवीगाळ केल्यामुळे मी त्यांना मारले असा खुलासा केला आहे. मात्र त्यांनी कॅमेरासमोर अधिक बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, राजा पातकर यांनी हा प्रकार किरकोळ असल्याचे सांगत हा आमच्या कुटुंबातील वाद आहे आणि कुटुंबामध्ये अशा छोट्या गोष्टी घडत असतात असे म्हणत प्रकरण वाढू नये यासाठी प्रयत्न केले. तरीही ही घटना कार्यकर्त्यांसमोर घडल्याने काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या प्रकारामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून, पक्षांतर्गत शिस्त आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें