घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

घरासमोर गाणी वाजवण्यास विरोध केल्याने गर्भवतीला भिंतीवर आपटून मारले

घरासमोर साऊंडवर गाणी वाजवण्यासह गोंधळ घालू नका, असे सांगितल्याने एका तरुणाने माहेरी आलेल्या गरोदर तरुणीचा गळा आवळून तसेच तिचे डोके भिंतीवर आपटून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील अलकुंटे चौकात घडला.

सोनी गणेश रामपुरे (19, रा. अलकुंटे चौक, उत्तर सदर बझार, सोलापूर) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. बापू सुरेश आरगोळ (26) असे संशयिताचे नाव आहे. या घटनेत तरुणीच्या गर्भाचाही दुर्दैवी अंत झाला. संशयितास अटक करण्यात आली असून तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

तरुणीच्या घरासमोरच लावला होता साऊंड…सोनी रामपुरे ही गर्भवती माहेरी आली होती. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास तिच्या घरासमोर संशयित बापू आरगोळ याने साऊंडवर मोठ्याने गाणी लावली होती. तसेच मोठ्याने आवाज करीत तो घरासमोर गोंधळ घालत होता.

यावेळी सोनी हिची आई लक्ष्मी म्हेत्रे यांनी माझी मुलगी नऊ महिन्यांची गरोदर आहे, साऊंड बंद करा आणि गोंधळ थांबवा, असे सांगितले.

परंतु बापू याने उलट लक्ष्मी म्हेत्रे यांना शिवीगाळ केली. सोनीचे लग्न त्याच्याशी झाले नाही हा राग मनात धरून त्याने भांडण सुरू केले. यावेळी सोनी ही भांडणात मध्ये आली असता बापू याने तिचा गळा आवळला आणि भिंतीवर डोके आपटले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें