सोलापूरमधील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवलं होतं. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती.अशातच या प्रकरणात आता नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. मात्र, या प्रकरणात नवा ट्विस्ट पहायला मिळतोय.
या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने यांनी स्वतःला दोषमुक्त करण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर कोर्टाने आता निकाल दिला आहे.बदनामी करण्याचा उद्देश नव्हता – मनीषा माने यांचे वकीलआरोपी मनीषा मुसळे-माने यांनी स्वतःला दोषमुक्त करण्यासाठी जिल्हा न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.
जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, यामुळे मनीषा माने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मनीषा यांनी डॉ. वळसंगकर यांना जो मेल पाठवला होता, त्यामागे वळसंगकर कुटुंबीयांची बदनामी करण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असा युक्तिवाद मनीषा माने यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयासमोर केला होता.
दोषमुक्ततेची मागणी फेटाळून लावली
केवळ याच मेलच्या आधारे त्यांना या प्रकरणात अडकवणं चुकीचं आहे, असं म्हणत त्यांनी दोषमुक्ततेची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद तूर्तास ग्राह्य धरलेला नाही अन् दोषमुक्ततेची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता आरोपी मनीषा मुसळे-माने यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.
जिल्हा न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर आता मनीषा माने यांच्या कायदेशीर टीमने वरिष्ठ न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. वकील प्रशांत नवगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
18 एप्रिल 2025 च्या रात्री 8:30 वाजता…18 एप्रिलच्या रात्री 8:30 वाजताच्या सुमारास त्यांनी सोलापूरमधील आपल्या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. डॉ. वळसंगकर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मनीषा मुसळे-माने यांच्या नावाचा उल्लेख होता, ज्यावरून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणाला वर्षपूर्ण झालं आहे, तरी देखील आरोपीला शिक्षा अद्याप झाल्याचं पहायला मिळत नाही.












